सोमवार, फेब्रुवारी 2, 2026
Google search engine
Homeक्रीडानवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची मुंबई मॅरेथॉन मध्ये उल्लेखनीय यशस्वी...

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची मुंबई मॅरेथॉन मध्ये उल्लेखनीय यशस्वी कामगिरी*

          *धावणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे मनोमन जाणून आपली धावण्याची आवड ध्यासात परिवर्तन करणारे आणि आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही पहाटे लवकर धावण्याचा नियमित सराव करणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज मुंबईत झालेली अत्यंत प्रतिष्ठेची टाटा मुंबई मॅरेथॉन अकराव्यांदा सहभागी होत 42 किलोमीटरचे अंतर 4 तास 39 मिनिटे 23 सेकंदात पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंचा सहभाग असणाऱ्या या मुंबई मॅरेथॉन मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.*

          गतवर्षी आयुक्तांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी होत 86.6 किलोमीटर अंतर 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात पूर्ण केले होते. या जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्येही सहभागी होत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. 

          *नुकत्याच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुव्यवस्थित रितीने पार पडल्या असून महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अत्यंत व्यस्त कामकाजाच्या कालावधीतही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पहाटेच्या वेळी धावण्याचा सराव करून व वेळेत कार्यालयात येऊन, पुन्हा उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज केले, मात्र सरावात खंड पडू दिला नाही. निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल व त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी आणि योग्य नियोजन या बलस्थानच्या आधारावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.*

          पहाटे 5 पासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रारंभ झालेली 21वी टाटा मुंबई मॅरेथॉन पुढे हुतात्मा चौक, चर्चगेट मार्गे मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे वरळी सीलिंक, माहीम, प्रभादेवी, हाजी अली व परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी पहिल्यांदाच मॅरेथॉनच्या मार्गात कोस्टल रोडचा समावेश होता. या उल्लेखनीय यशस्वी कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments