सोमवार, फेब्रुवारी 2, 2026
Google search engine
Homeराजकीय2 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून पालक व कुटूंबियांना केला मतदानाचा आग्रह

2 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून पालक व कुटूंबियांना केला मतदानाचा आग्रह

नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत असून नागरिकांनी या पध्दतीत कसे मतदान करावे याकरिता विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती केली जात आहे. या अनुषंगाने मतदार जनजागृतीच्या स्वीप उपक्रमांतर्गत शाळांमध्येही अभिनव उपक्रम राबविले जात आहेत.

असाच मतदान करण्याचे पालकांना व नातेवाईकांना आवाहन करणारा पत्रलेखन हा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 36 व 122 कोपरखैरणे गाव या ठिकाणी राबविण्यात आला. या अंतर्गत 2026 इतक्या मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर पत्रलेखन करुन आपले आई वडील, कुटूंबिय,नातेवाईक यांना 15 जानेवारी रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत आमच्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

निवडणूक विषयक स्वीप उपक्रमांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षणांधिकारी श्री. अशोक कडूस व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांच्या नियंत्रणाखाली,  केंद्र समन्वयक श्री. जयप्रकाश सिंह व मुख्याध्यापक सौ. संख्ये आणि सौ. डॉली चराटकर यांच्या माध्यमातून मतदान करणे विषयी आवाहन करणारा पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम अतिशय उत्साहात राबविण्यात आला.

सध्याच्या माहिती तंत्रज्ञान स्नेहीयुगात संदेशाची देवाण घेवाण प्राधान्याने डिजीटल माध्यमातून होत असतांना पत्र लेखनाची पारंपारिक पध्दत लोप पावल्याचे दिसून येत आहे. मात्र पत्र व पत्रातील संदेश हा नेहमीच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे पत्र लेखनासारख्या आपुलकीच्या माध्यमाला स्पर्श करीत विद्यार्थ्यांना पत्र लेखनाचे महत्व कळावे व या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश प्रसारित व्हावा या दृष्टीने पत्र लेखना सारखा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे कलाप्रेमी शिक्षक श्री. प्रशांत गाडेकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयकाची महत्वाची भूमिका बजावली. या कामी त्यांना श्री. संतोष मळेकर आणि शाळेतील शिक्षक व समुहसंघटकांचे सहकार्य लाभले.

मतदानाचा संदेश जनमानसात प्रसारित करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत असून पत्र लेखनासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून कोपरखैरणे गाव येथील महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी आमच्या भविष्यासाठी 15 जानेवारीला हक्काने मतदान करा असा संदेश पत्रातून हट्टाने दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments