मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप करुन नागरिकांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती

0
11

नवी मुंबई, दि. 7 जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी जाहीर केलेल्या संकल्पनेनुसार 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये आज प्लास्टिक पिशव्या वापरु नये या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली व प्लास्टिकला पर्यायी कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त आणि त्यांचा अधिकारी – कर्मचारीवृंद यांच्या वतीने कापडी पिशव्या वाटपाचा वेगळा उपक्रम सर्व विभागांमध्ये राबविण्यात आला. यामध्ये बेलापूर विभागात दिवाळे मच्छी मार्केट, नेरुळ विभागात से.29 दैनंदिन बाजार, वाशी विभागात से.9 मार्केट, तुर्भे विभागात चाईल्ड लाईफ स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने एपीएमसी मार्केट व तुर्भे स्टोअर बुध्दविहार परिसर, कोपरखैरणे विभागात से.8 येथील भाजीपाला, मटण व फिश मार्केट, घणसोली विभागात से.4 हावरे चौक मार्केट व ऐरोली विभागात से.5 जय भवानी मार्केट या ठिकाणी प्रतिबंधात्मक प्लास्टिक न वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच कापडी पिशव्यांचे वाटप मार्केटमध्ये येणा-या नागरिकांना करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र प्लास्टिकमुक्त असावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून महानगरपालिकेच्या वतीने जनजागृतीप्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराविरोधात दंडात्मक मोहीमा राबवून नागरिकांमध्ये प्लास्टिकला नकार देण्याची सवय वृध्दींगत केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here