सोमवार, फेब्रुवारी 2, 2026
Google search engine
Homeआरोग्यनवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली बेघर निवारा केंद्रातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली बेघर निवारा केंद्रातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत घणसोली येथे बेघर निवारा केंद्र कार्यरत असून या केंद्रात सध्या 100 लाभार्थी राहत असून त्यामध्ये 48 पुरुष, 50 महिला आणि 2 मुले यांचा समावेश आहे.

या बेघर निवारा केंद्रात आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये महिला व पुरुष मिळून एकूण 61 लाभार्थ्यांनी  सहभाग घेतला .

महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार. समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या नियंत्रणाखाली बेघर निवारा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या योग दिवस उपक्रमात योग प्रशिक्षिका निशा जंगीड  यांनी योगासनांचे धडे दिले. एनयूएलएम विभागाचे व्यवस्थापक तुषार पवार यांनी बेघर निवारा केंद्रातील लाभार्थीना योगाचे महत्व विशद करून सांगितले. योगामुळे मन व शरीर संतुलित राहते तसेच प्रत्येकाने  रोज नियमितपणे योग करावा असे आवाहन त्यांनी केले.  हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था समाजिक विकास सेवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी  विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments